आंबोली धबधब्यावरून दगड कोसळल्याने पर्यटक जखमी


सिंधुदुर्ग : ईदच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल झाले होते. दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधब्यावरून सुमारे एक ते दीड फूट रुंदीचे दोन-तीन दगड कोसळले.

यातील एक दगड बेळगाव येथील एका पर्यटकाला लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. गेल्या दोन दिवसांपासून आंबोलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी ईद आणि आषाढी एकादशीची सुट्टी असल्याने धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते. धबधबा अजूनही तितक्या प्रमाणात कोसळत नाही. तो काही प्रमाणात वाहून गेला आहे. त्यावर काही लोक आंघोळीचा आनंद लुटत होते.

पर्यटक आंघोळीचा आनंद लुटत अचानक धबधब्याच्या माथ्यावरून हे दगड पडताना पाहून त्या ठिकाणी उपस्थित पर्यटकांची धावपळ उडाली. सुदैवाने मोठी हानी झाली नाही. धबधब्याच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ( Tourist injured due to stone fall from Amboli waterfall )