दिल्लीसाठी खुशखबर, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू रिषभ पंतची जागा घेणार!
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा नुकताच भीषण कार अपघात झाला. ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पंतचे मनगट, गुडघा आणि पायाला जबर दुखापत झाली आहे. या कार अपघातामुळे पंत आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार नाही. त्यांना पूर्णपणे ठीक होण्यासाठी किमान १ वर्ष लागेल. अशा परिस्थितीत त्याची आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. कारण पंत हा संघाचा फक्त कर्णधारच नाही तर सर्वात महत्त्वाचा खेळाडूही आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने संघाकडे कर्णधारपदाचा चांगला पर्याय आहे. पण दिल्लीला अशा यष्टीरक्षक फलंदाजाची यावेळी गरज आहे. जो पंतसारखा आक्रमक खेळू शकतो. डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने संघाकडे कर्णधारपदाचा चांगला पर्याय आहे. पण डीसीला अशा यष्टीरक्षक फलंदाजाची यावेळी गरज आहे. जो पंतसारखा आक्रमक खेळू शकतो. जे कदाचित आता दिल्लीला फिल सॉल्टच्या रूपात मिळाले आहे. आपण इंग्लंडचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्टबद्दल बोलत आहोत, जो सध्या दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळत आहे.
POV: You’re watching Phil Salt’s fearless ball-striking ability on full display! 🤩
Here are some of his best shots from the #HighveldDerby! 💥#RoarSaamMore #PCvJSK #SA20 | @PhilSalt1 pic.twitter.com/rnBrE8jMsL
— Pretoria Capitals (@PretoriaCapsSA) January 20, 2023
त्याने अलीकडेच सनरायझर्स इस्टर्न कॅपविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करताना दहशत निर्माण केली. ४७ चेंडूंचा सामना करत सॉल्टने जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना नाबाद ७७ धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये ११ चौकारांचा समावेश होता. आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात दिल्ली कॅपिटल्सने सॉल्टला २ कोटी देऊन खरेदी केले होते.
नुकतेच IPL २०२३ चा मिनी लिलाव कोची येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपये देऊन फिल सॉल्ट विकत घेतले. त्याचबरोबर कर्णधार ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर तो त्याच्या अनुपस्थितीत संघाचा कायमस्वरूपी यष्टिरक्षक होऊ शकतो. फिल सॉल्ट हा पंतप्रमाणेच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जे त्याने दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्येही केले होते. अशा परिस्थितीत आगामी आयपीएल मोसमात फिल ऋषभची पोकळी भरून काढू शकतो.