खालापूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
खालापूर तालुक्यामधील चौक व लोधिविली ग्रामपंचायतीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद विभागप्रमुख सुधीर ठोंबरे, लोधिवली ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन मेश्राम, सदस्य सदानंद हंबीर, राजेश भोंडगे, शांताराम तेवले, व्यंकट सुरवसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
या सर्वांचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्य सरकारच्या पाठीशी खडकासारखे उभे आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आता वेगाने होईल.
खालापूर तालुक्यातील चौक व लोधिविली ग्रामपंचायतीतील शिवसेना उ.बा.ठा. गटाचे जिल्हा परिषद विभागप्रमुख श्री.सुधीर ठोंबरे, लोधिवली ग्रामपंचायत सदस्य श्री.चेतन मेश्राम, सदस्य सदानंद हंबीर,राजेश भोंडगे,शांताराम तेवले, व्यंकट सुरवसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/vbXHoHSzFC
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) January 9, 2023
हेही वाचा – IND vs SL: टीम इंडियासमोर मोठे संकट, ‘हा’ स्टार खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर!
यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत आमदार महेश बालदीजी, आमदार प्रशांत ठाकूरजी उपस्थित होते.