महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधुमक्षिकापालन योजनेसाठी करा अर्ज!
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी व संस्थांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.डी. कुरुंदवाडे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 18 जून 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष, छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण संवर्धनाची जनजागृती आदी सदर्भात माहिती दिली जाते. योजनेंतर्गत वैयक्तिक मधपाळ घटकासाठी अर्जदार हा साक्षर असावा, त्याची स्वतःची शेती असल्यास प्राधान्य असून वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ या घटकांतर्गत संबंधित व्यक्ती हा किमान 10 वी उत्तीर्ण असावा. वय वर्ष 21 पेक्षा जास्त असावे.
संबंधित व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्याकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था या घटकांतर्गत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर चेलारैली किमान 1000 चौ. फूट सुयोग्य इमारत आसावी.
संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रतिक्षणपूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य रहिल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे लाभार्थीस अनिवार्य राहील. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय कुडाळ दूरध्वनी क्र. 02362-222220 येथे संपर्क साधवा.