सावंतवाडी: ओटवणे घाटात एसटीचा गिअर झाला लॉक, प्रवासी थोडक्यात बचावले!
सावंतवाडी- ओटवणे येथे एसटीचा मोठा अपघात होता होता राहिला. एसटी बसचा रिव्हर्स गिअर लॉक झाल्यामुळे एसटी भर रस्त्यावर मोठ्या उतारावर अडकल्याची घटना शनिवारी सकाळी ओटवणे खोऱ्यातील वळणावर घडली. सुदैवाने एसटी चालकाने ब्रेक लावल्याने आणि दाखवलल्या प्रसांगावधानामुळे एसटी जागीच थांबल्याने पुढील अनर्थ टळला आणि मोठी जीवतहानी टळली.
सावंतवाडी-ओटवणे ही एसटी सावंतवाडी बसस्थनकातून सकाळी 8.40 वाजता निघाली, तेव्हा एसटीचा रिव्हर्स गियर लॉक झाल्याने ओटवणे घाटातील यू-आकाराच्या वळणावर आली. त्यामुळे चालकाने तात्काळ ब्रेक लावून एसटी जागीच थांबवली. अन्यथा एसटी खाली 30 फूट खोल दरीत गेली असती. एसटी चालकाने घटनेची माहिती सावंतवाडी बसस्थानकात दिली. दरम्यान, ही बस ओटवणे गावात न गेल्याने महाविद्यालयात येणाऱ्या प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. ( ST gear locked in Otvane sawantwadi )