अभ्यास करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
मुलं रोज तासंतास अभ्यास करतात पण पेपराच्या दिवशी किंवा परीक्षेच्या वेळी त्यांना काहीही आठवणीत राहत नाही. किंवा आठवणीत असून सुद्धा ते त्याचे उत्तर त्यांना लिहिता येत नाही. किंवा खूप विद्यार्थ्यांचा हा एकच प्रश्न असतो की परीक्षेच्या वेळी जो मी अभ्यास केला आहे त्यातले काहीच आले नाही तर काय करायचे? आपण नेमका अभ्यास कसा केला पाहिजे? आणि वाचलेले लक्षात कसे ठेवले गेले पाहिजे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना येत असतात. जर तुम्ही टॉपर विद्यार्थ्यांना पाहाल तर ते जास्त वेळ अभ्यास सुद्धा करीत नाही तरी प्रत्येक परीक्षेत ते प्रथम येतात असं का होतं? यामागे कारण काय आहे मित्रांनो परीक्षेत प्रथम येणारे विद्यार्थी हार्ड वर्क न करता स्मार्टवक करतात. त्यांना माहीत असते की कशा पद्धतीने अभ्यास केल्याबद्दल त्यांना वाचलेले लक्षात ठेवायला मदत मिळणार आहे. आणि कशाप्रकारे अभ्यास करून पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परीक्षेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याच्या पद्धती आणि आज आपण जाणार आहोत की अभ्यास कसा करावा वाचलेले लक्षात कसे ठेवावे आणि वाचलेले लक्षात राहण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे.
आधी आपण अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया. तुम्हाला जेव्हा मन लागेल तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकतात पण जर तुमचे अभ्यासात चित्त लागत नसेल कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर अशावेळी सकाळची शांत वेळ अभ्यासासाठी योग्य आहे. सकाळी वातावरणात शांतता असते तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोघीही अतिशय फ्रेश असतात. म्हणून सकाळच्या वेळी अवघड वाटणारे विषय वाचावे.
अभ्यास करण्याच्या योग्य पद्धती कोणत्या आहेत?
उत्सुकता – पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उत्सुकता कारण जर अभ्यासाला बसण्याची तुमची इच्छाच होतं नसेल तर कोणतेही उपाय करून फायदा नाही पण सर्वात आधी तुम्हाला एकदम फ्रेश व्हावं लागेल शरीर व मनाला एकदम ताजे करा यानंतर अभ्यासाला बसताना टेबल खुर्ची यासारख्या उंच वस्तु घ्या पुरेसे उजेड आणि शांतता असलेल्या रूममध्ये पाठ ताट करून अभ्यासाला बसा.
नियमितपणा – कोणतीही गोष्ट जर तुम्ही करत नियमित असाल तर काही दिवसांनी शरीराला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सकाळी उठण्याची सवय लावता पण तुम्हाला आधी खूप कंटाळा येईल पण जसं तुम्ही रोज सकाळी लवकर उठायचे ठरवता आणि रोज असं केल्याने याची तुम्हाला सवय होते. आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली सकाळी लवकर जाग येते जरी सुरुवातीला तुमचं मन अभ्यासात लागत नसेल तरी बळजबरीने अभ्यासाला बसा काही दिवसातच तुम्हाला अभ्यास करण्याची आवड होईल. पण यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल. अभ्यासाला बसण्याआधीच सर्व अडथळे दूर करायचे घरच्यांना या गोष्टीची कल्पना देऊन द्यावी की तुम्ही अभ्यास करीत आहात व किमान एक तास तरी तुम्हाला आवाज देऊ नका आणि मोबाईल टीव्ही सारखे अडथळ्यांना पण बंद करून ठेवा किंवा दूर ठेवा.
परत परत वाचणे – ज्या पण विषयाचा तुम्ही अभ्यास करीत असाल किंवा जे काही तुम्हाला वाचलेले लक्षात ठेवायचे असेल त्याला वारंवार वाचावे मनातल्या मनात ण वाचता मोठ्याने वाचून रीपीट करावे. पुन्हा पुन्हा वाचताना आपले पूर्ण लक्ष त्या वाख्याकडे असावे. जेणेकरून ती माहिती लक्षात राहावी. परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अशा पद्धतीने अभ्यास केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
लिहिणे – जर परत परत वाचून सुद्धा तुम्हाला शंका आहे की तुम्ही वाचलेले परत विसरू शकतात तर तुम्ही लिखाण पण करू शकतात. यासाठी वाचन पूर्ण झाल्यावर पुस्तकात न पाहता आपल्या वहीत उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा या पद्धतीने अभ्यास केल्यास अभ्यास कसा करावा हा प्रश्न तुमच्या डोक्यात येणारच नाही. आणि वाजलेले लक्षात ठेवायला नक्कीच उपयोग होईल. जेही तुम्ही वाचता आणि ते लिहितात तर ते नक्कीच छान लक्षात राहील.
मनाची एकाग्रता – मनाची एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट आहे एकाग्रता. कोणतीही गोष्ट एकाग्रतेने केल्यास त्याचे लाभ नक्कीच मिळतात. चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी शांत मन आणि एकाग्रतेचा आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही ध्यान आणि योग प्राणायाम करू शकतात. अभ्यासाला बसण्यापूर्वी दहा मिनिटे कोणताही विचार डोक्यात येऊ देऊ नका आपले चित्त श्वासावर एकाग्र करा. श्वास कशा पद्धतीने आत बाहेर होत आहे ते अनुभव करा.
प्रेरणा – अभ्यास असो वा इतर कोणतेही कार्य असो त्याला उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते यासाठी तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड व्हावं लागेल. आतून प्रेरणा निर्माण करण्यासाठी तुम्ही आयुष्यात एक स्वप्न ठरवू शकतात आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू करू शकतात किंवा प्रेरणादायी पुस्तके तुम्ही वाचा किंवा व्हिडिओ पहा.