आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये भुकंप सदृश्य आवाज!
सावंतवाडी: आंबोलीच्या पायथ्याशी सह्याद्री पट्ट्यात शनिवारी रात्री ८ वाजून ५० मिनीटाच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवले. सावंतवाडी तालूक्यातील सांगेली माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे या गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे.
भूकंपाचा धक्का 3.0 रिश्टर स्केल इतका नोंदविण्यात आला आहे.हा भूकंप सावंतवाडीच्या पूर्वेला 4 किलोमीटर आणि खोली 5 किलोमीटर असा नोंदविण्यात आला आहे. रात्री ८ वाजून ५० मिनीटांनी मोठा आवाज होऊन जमीन हादरल्याने भूकंपाचा सौम्य धक्का असावा, असा अंदाज लावला जात आहे.
दरम्यान याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती उशिरापर्यंत प्राप्त झाली नाही. काही वर्षांपूर्वी असाच काहीसा धक्का सावंतवाडीत बसला होता. असाच काहीसा प्रकार आजने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.