सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या सर्व तालुक्यात पाऊस किती झाला ते


सिंधुदुर्गनगरी, दि.6 : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 135.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 115.9 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 849.6 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे .कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. ( Sindhudurg Rain update )

  • देवगड- 114.5 (856.5)
  • मालवण-109.9 (865.1)
  • सावंतवाडी-118.1 (986.6)
  • वेंगुर्ला-135.6 (866.2)
  • कणकवली-111.8 (732.1)
  • कुडाळ- 104.7 (830.7)
  • वैभववाडी- 135.1 (801.7)
  • दोडामार्ग-112.8 (885.8)