सिंधुदुर्ग : जिल्हास्तरीय फूटबॉल स्पर्धा 24 जुलै रोजी


सिंधुदुर्ग : जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धा दि. 24 जुलै 2023 रोजी सकाळी 9 वाजता श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी, आपल्या फुटबॉलच्या संघास स्पधेच्या ठिकाणी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीव्दारा सन 2023-24 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 62 वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो फुटबॉल कप ( सुबज्युनियर, ज्युनियर) क्रीडा स्पर्धा या खेळाच्या स्पर्धाच्या आयोजन करण्यात आलेले आहे. खेळाची राष्ट्रीय स्पर्धा दि.14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत 17 वर्षाखालील मुले, मुली (ज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होत आहेत. 14 वर्षाखालील मुले, मुली (सबज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा बंगलुर या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.

जे संघ सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापुर्वी या www.subrotocup.in संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. वयोगट :- 14 वर्षाखालील मुले (सबज्युनियर) जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2007 रोजी किंवा ज्यांनतर जन्मलेला असावा.