वैभववाडीतील त्या महिलेच्या हत्येचं कारण आलं समोर! संशयित आरोपी आहे अट्टल गुन्हेगार


वैभववाडी: सोनाळी गावात वाणीवाडी येथील जयश्री दत्ताराम साटम (थोटम) वय 65 या वयोवृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 7:30 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. आणि फक्त 2 तासातच पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सचिन सुरेश निखार्गे वय 40 असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.

संशयित आरोपी सचिन निखार्गे हा अट्टल गुन्हेगार आहे. चोरी, घरफोडी व बलात्कार असे त्याच्यावर जवळपास सात ते आठ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. तब्बल 14 वर्षे जेलवारी करून तो आला आहे. अडीज वर्षांपूर्वी तो सोनाळी येथे वास्तव्यास आला आहे. त्याचे वयोवृद्ध आई-वडील गावीच आहेत.

मयत जयश्री दत्ताराम साटम यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. पैशाच्या आणि दागिन्यासाठीत संशयीत आरोपी सचिन सुरेश निखार्गेने तिचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.