राखी सावंतला अटक: शर्लिन चोप्राने केली होती तक्रार


गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीने सांगितले होते की, तिच्या आईला, जी कॅन्सरग्रस्त आहे, तिला आता ब्रेन ट्युमर झाला आहे. यानंतर अभिनेत्रीचे बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. आदिलने लग्न स्वीकारल्यानंतर अभिनेत्रीच्या गर्भधारणेच्या आणि गर्भपाताच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. आता राखी सावंतला पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, मॉडेल शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्या आधारावर पोलिसांनी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज काल म्हणजेच बुधवारी मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळला, त्यानंतर तिला आज गुरुवारी 19 जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले.

लग्न, गर्भधारणा आणि गर्भपाताच्या बातम्यांदरम्यान राखी सावंतला पोलिसांनी अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.  अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या तक्रारीमुळे पोलिसांनी राखीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राने एक ट्वीट केलं आहे त्यात तिनं  लिहिलं आहे की, आंबोली पोलिसांनी राखी सावंतच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यामुळे तिला अटक केली आहे.

राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यातील वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. अनेकदा दोघेही एकमेकांवर आरोप करताना दिसले आहेत. शर्लिननेही राखी सावंतवर तिचा नवरा आणि बॉयफ्रेंड बदलल्याचा आरोप केला होता. शर्लिन म्हणाली होती की राखी पती आणि बॉयफ्रेंडला कामावर ठेवते आणि त्यांना गरीब करून सोडते.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा