राहुल द्रविडचा मुलगा बनला कर्नाटक संघाचा कर्णधार


भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. मात्र आयसीसी स्पर्धांमधील भारताची कामगिरी अजूनही चिंतेचा विषय आहे. एकेकाळी राहुल द्रविड देखील भारतीय संघाचा कर्णधार असायचा. त्याचवेळी त्याचा मुलगा अन्वय द्रविडही लवकरच ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड याला कर्नाटकचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो १४ वर्षांखालील इंटर झोनल स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अन्वय त्याच्या वडिलांप्रमाणेच एक जबरदस्त फलंदाज आहे. अन्वय त्याच्या यष्टिरक्षणासाठीही ओळखला जातो.

याशिवाय अन्वयला एक मोठा भाऊही आहे. ज्याचे नाव आहे समित द्रविड. तो देखील उत्तम फलंदाजी करतो. दोन्ही भाऊ आपल्या वडिलांप्रमाणे फलंदाज बनले आहेत. आता अन्वयकडे आगामी इंटर झोनल स्पर्धेत कर्णधारपदाची मोठी जबाबदारी असणार आहे. कर्णधारपदाखाली तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा