PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार 14 वा हप्ता ? जाणून घ्या
प्रधानमंत्री किसान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 हप्ते जमा झाले आहेत. शेतकरी आता 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या अपडेटनुसार ही रक्कम जुलैच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाऊ शकते. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
14 व्या हप्त्यादरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते
अनेक राज्यांमध्ये जमिनीच्या नोंदी पडताळणीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत या यादीतूनही मोठ्या संख्येने लोकांना हटवले जात आहे. या प्रक्रियेला वेळ लागत आहे. अशा लोकांना सरकारकडून पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवल्या जात आहेत. पैसे परत न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत असून, त्यापूर्वीच ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ई-केवायसी न केल्यास शेतकरी पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
शेतकऱ्यांनी याप्रमाणे ई-केवायसी करून घ्यावे
- यासाठी तुम्हाला प्रथम www.pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- त्यानंतर E-KYC च्या पर्यायावर जा.
- यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका.
- आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका.
- यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमचे ई-केवायसी केले जाईल.
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी शेतकरी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. इथेही तुमची प्रत्येक समस्या दूर होईल.