PAK vs NEP: नेपाळवर पाकिस्तानचा 238 धावांनी मोठा विजय


आशिया कप 2023 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा (Pakistan vs Nepal) 238 धावांनी पराभव केला आहे. यासह पाकिस्तानने आशिया चषकाची विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 6 विकेट गमावत 342 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 23.4 षटकांत 104 धावांवर गारद झाला. नेपाळकडून सोमपाल कामीने सर्वाधिक 28 धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक 4 बळी घेतले. शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफने 2-2 विकेट घेतल्या. नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

343 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळने अवघ्या 1.4 षटकांत तीन विकेट गमावल्या. शाहीन आफ्रिदीने पहिल्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन बळी घेतले. नेपाळला चौथा धक्का आरिफ शेखच्या रूपाने बसला. हरिस रौफने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर नेपाळचा संपूर्ण संघ 23.4 षटकांत 104 धावांत गारद झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 6 गड्यांच्या मोबदल्यात 342 धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान फलंदाजी करताना बाबर आझमने शानदार शतक झळकावले. त्याने नेपाळच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. बाबर आझमने 131 चेंडूत 151 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय इफ्तिखार अहमदने अवघ्या 71 चेंडूत 109 धावा केल्या. नेपाळकडून सोमपाल कामीने सर्वाधिक २ बळी घेतले. तर करण केसी आणि संदीप लामिछाने यांनी 1-1 विकेट घेतली.