संजय राऊत राज्यसभेत जे काही बोलायचा ते मी सांगेन – नारायण राणे
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर राज्यसभेत माझ्या शेजारी बसलेल्या संजय राऊतने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलाला ते मी सांगणार आहे. एक दिवस मी हे सर्व उद्धव ठाकरेंना सांगेन. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतला चप्पलने मारतील. संजय राऊत शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याच्या कामात मग्न आहे. संजय राऊत हा शिवसेना संपवणारा आहे. असं नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले.
नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत तुम्ही मला जिथे बोलावल तिथे मी यायला तयार आहे. मी संरक्षण सोडण्यास तयार आहे. राणे म्हणाले की, सध्याच्या राजकीय वातावरणात संजय राऊत हे जोकरच्या भूमिकेत आहेत. संजय राऊत यांना मी पत्रकार अजिबात मानत नाही, असेही राणे म्हणाले.
माझ्या नादाला लागू नका नाहीतर… – संजय राऊत
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधताना तुमच्या शंभर बनावट कंपन्यांचा खुलासा केला तर तुम्हाला पन्नास वर्षे तुरुंगात राहावे लागेल, असे म्हटले होते. नारायण राणे, माझ्या नादाला लागू नका नाहीतर मी तुम्हाला विवस्त्र करेन, असे ते म्हणाले. तू काय मला लढायला काय शिकवणार? सीबीआय आणि ईडीच्या भीतीने तु पक्ष सोडून पळून गेलात. तू माझ्याशी बोलण्यास योग्य नाहीस. आजपर्यंत मी याबाबत काहीही बोललो नाही, मात्र ते बोलताना ‘अरे-तुरे’ भाषेत बोलतात. कालपर्यंत एकनाथ शिंदेंना ‘आरे-तुरे’ म्हणत. त्याआधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हेच म्हणायचे, हे कोण आहेत? असं संजय राऊत म्हणाले होते. हेही वाचा – शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली!
सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे – संजय राऊत
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत संजय राऊत यांनी या सरकारला फेब्रुवारी महिना बघता येणार नसल्याचा दावा केला. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकीय वातावरण बदलाच्या दिशेने जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, मात्र त्याआधीही बदल होऊ शकतो. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिना पाहण्याआधीच हे सरकार पडेल याची मला खात्री आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव नसेल तर संविधान आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांचे हे बेकायदेशीर सरकार पडेल. यातील 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतील याची मला खात्री आहे. सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे. ज्या दिवशी न्यायालय निकाल देईल त्या दिवशी सरकारचे रामनाम होईल.