एलपीजी गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त


LPG Cylinder Price Reduced: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. महिलांना मोठी भेट देत केंद्रातील मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमतीत आता 100 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. हे पाऊल उचलण्यामागे सरकारचा उद्देश महिला शक्तीचे जीवन सुसह्य करणे आणि करोडो कुटुंबांचा आर्थिक भार कमी करणे हा आहे.

ट्विटरवरील एका पोस्टमध्ये याबद्दल माहिती देताना पंतप्रधानांनी लिहिले की, “महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.”