सावंतवाडीतील श्री देव उपरलकर देवस्थानाचा इतिहास जाणून घ्या…


चमत्कार म्हणजे अद्भुत घटना निसर्गाचा नियम ज्या घटनांना लागू पडत नाही अशा घटनांना अद्भुत म्हणजेच आश्चर्य असे म्हणतात. काही धार्मिक लोकांना असे वाटत असते की अध्या आणि अध्यात्मिक अनुभव हे धर्माच्या ही पलीकडील काहीतरी वैश्विक सत्य आहे.  दैवी दृष्टांत स्वप्नात देव दिसणे हे देखील आध्यात्मिक अनुभव आहे भक्तांच्या हाकेला ही ईश्वर सगुण किंवा निर्गुण रूपात अनेक वेळा धावून आलेला आपण ऐकलं असेल.  एवढेच नव्हे तर कधी कधी त्याने प्रत्यक्ष दर्शनही दिलेले आहे आणि आज ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होय.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबाबत सांगणार आहोत येथे अनेक लोकांना या देवाचा दृष्टांत झालेला आहे. सावंतवाडी बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर श्री देव उपरकर हे देवस्थान आहे. 365 खेडेगावांचा मालक व रक्षण करता म्हणून श्रीदेव उपक्रम या देवस्थानाची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानाच्या साडेतीनशे वर्षाच्या कालखंडात व देवस्थानाच्या इतिहासात या देवस्थानाची ओळख नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव अशी आहे. श्री देव उपरळकर ओळख सर्वत्र असल्याने या मार्गाने जाणारे वाहन चालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात.

श्री देव उपरलकर या देवस्थाना हे शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते. आणि त्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे. या देवस्थानाच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथाही सांगितले आहे. सावंतवाडी संस्थानाचे राजे श्री बापूसाहेब महाराज यांची श्री उपरलकर देवावर अनन्य भावी श्रद्धा होती. ज्याबाबत एक कथाही सांगितली जाते ती अशी की ज्यावेळी सावंतवाडी संस्थानावर गनिमांचा हल्ला झाला त्यावेळी संस्थानाची त्यांना प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती. त्यावेळी तात्कालीन राजे आबासाहेब देवपूजेसाठी श्रीदेव पाटेकराकडे बसले होते. सेनापती दळवी यांनी गरिमांच्या चढायची हकीगत त्यांच्या कानी घातली राजे साहेबांनी दळवींच्या हातात नारळ दिला व उपरलकर गाराणे घालून नारळ फोडण्यास सांगितले. सेनापतींनी तसे करताच गांधील माशांचा मोहोळ यांचा मोहोळ उठून त्यांनी शत्रूंची दाणादान उडून दिली. श्री देव उपरलकर देवाच्या कृपेने त्या काळी सैन्य पळविण्यात खेम सावंत यांना यश आले.  त्यावेळी त्यांनी ओठवणे येथे कौल प्रसाद घेतला त्यावेळी श्री देव उपरलकर यांनी मी त्यात संस्थानातून जाणार नाही असे सांगितले तेव्हापासून संस्थानाच्या 365 खेड्यांचा मालक म्हणून ही जबाबदारी उपरनकर देवाने घेतली आहे अशी आख्यायिका आहे.

समोरचे दिसत आहे त्याला चाळा असे म्हणतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चाळा म्हणजे काय तर चाळा म्हणजे करणीबाधा भूतबादा घालवणारी एक शक्ती. अशी येथील लोकांची भावना आहे. करणी बाधा होऊ नये यासाठी या ठिकाणी कोंबा देण्याची प्रथा आहे. श्री उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्याहीपेक्षा नवसाला पावणारा देव म्हणून या देवस्थानाची ओळख आहे.