गावात रात्रीच्यावेळी फेरफटका माराणाऱ्या ‘दांडेकर’ देवाताबद्दल जाणून घ्या माहिती


आजही काही लोक संभ्रमात आहेत की पूर्वीचा महार म्हणजे दांडेकर काय? तर त्याचे उत्तर आहे होय. पूर्वीचा म्हणजे जो पूर्वी आला मग तो हजारो वर्षांपूर्वी आला असला तरी आपण त्याला पूर्वीचा म्हणतो. तुम्हाला आम्ही दांडेकर म्हणजे काय याचे स्पष्टीकरण देणार आहोत. आपण जर वेगवेगळ्या गाव राहटील घराण्याचा अभ्यास केला व त्याचे शब्दांना जोडून येणाऱ्या इतर शब्दांचा नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल व स्पष्ट होईल की कोकणातील पहिले वसाहतकार म्हणून महार समाजाचा उल्लेख प्रथम केला जातो. गाव जोडत्याने म्हणजेच पूर्वीच्या महाराने गावाच्या सीमा आखून गावाचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवून ज्याच्या हातात दांडा दिला तो दांडेकर. म्हणजे एखाद्या बापाने आपले कार्य पूर्ण करून त्याची पुढील जबाबदारी आपल्या लेकराच्या हातात सोपवली शेवटी तो वस एकच म्हणजे महारवस म्हणून कोकणात कित्येक गावात महार वसालाच लोक दांडेकर म्हणून हाक मारतात.

दांडेकर म्हणजेच वर्तमान काळातील महारवस पूर्वीच्या महाराचा अंश या सगळ्यांमध्ये म्हणजेच महारवासामध्ये नांदत आहे. पूर्वीचा महार म्हणजेच या भूमीवर आलेला सर्वात पहिला महार व दांडेकर याला पायाचा प्रथम पुरुष असं म्हटलं जातं. शेवटी वस एकच मर्यादेच्या सर्व गुंड्याजवळ फळात हा दांडेकर जाऊ शकतो एवढी ताकद व शक्ती त्यामध्ये आहे. सीमेच्या आतील सर्व जमीन दांडेकरांची स्मशान म्हणजे त्याच्यासाठी खेळ स्मशानात जे पैसे ठेवले जातात ते महाराला देतात. कारण तोच त्या स्थळाचा जागेचा मालक ठरतो. दांडेकर म्हणजे असा तसा किंवा साधे सुद्धा रूप नाही दांडेकर व महाकाय शक्ती आहे. त्याच्यापुढे कोणाचाही निभाव लागत नाही.

प्रत्येक गावात दांडेकरांचे स्थान असते या दांडेकर देवतेस मोठा मान आहे रक्षण करण्याचे काम या स्थळाकडे असते भजनुकीसाठी व मानासाठी हे स्थळ महार वासाकडेच असते. प्रथम वसाहतकार म्हणून त्यांना भूमिपुत्र म्हटले जाते. व्यवहारिक दृष्ट्या त्यांची भूमि आज इतरांच्या ताब्यात गेली असली तरी धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या ते जमिनीचे खरे मालक आहेत. म्हणून शेती पिकल्यावर नवांना नंतर शेतात महाराने मुठ मारल्याशिवाय शेतकरी शेत कापणे करीत नाही. वसाहती योग्य भूमि निर्माण झाली म्हणून अनेक लोक तेथे येऊन राहिले देवतांची मंदिराची स्थापना झाली. गावराटीची महार समाजाला आद्य वसाहतकार म्हटले जाते आणि त्यांचा मान देवस्थान सर्वात मोठा आहे.

दांडेकर ही देवता इतके विशाल आहे की अचानक कोणी याला सामोरे गेले म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीच्या तो समोर आला तर ती व्यक्ती आजारी पडेल. दांडेकरच्या दांड्यात 12 अंधार असतात व तो दांडा आपल्या हातातल्या मुठीत घेऊन तो चालत असतो जेव्हा गाव सुनसान होते म्हणजे जेव्हा लोक झोपलेली असतात तेव्हा त्याचा फेरा चालू होतो. तो रात्रभर सीमा फिरत असतो. आणि बाकीच्या वेळी हे 12 आमदार हे बाराताडे सीमेचे रक्षण करीत असतात. डोक्यावर फेटा एका हातात कंदील दुसऱ्याचा दांडा अंगावर जाकेट धोती व पायात जांभळ्याची चप्पल आणि खांद्यावर काळी घोंगडी म्हणजेच कांबळ असा दांडेकर देवतेचा पेरावा आहे.

एक गोष्ट ही लक्षात ठेवा ज्या ठिकाणातून दांडेकरांचा फेरा असतो म्हणजे ज्या वाटेने तो चालतो त्या वाटेत जर कोणी झोपले असेल तर दांडेकर एकदा दोनदा त्याला आपल्या दांड्याने हलवून उठवण्याचा प्रयत्न करतो व जर ती व्यक्ती नाही उठली तर तो सरळ त्या व्यक्तीला उचलून कोठेही लटकवून ठेवतो अशा गोष्टी कित्येक गावात घडलेल्या आहेत व जुन्या माणसांकडून या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस जर दांडेकरांच्या तावडीत कोण सापडले तर तो त्याला त्याच्याबरोबर रात्रभर सीमा फिरवत असतो दांडेकर हा वाट चुकणाऱ्याला वाटही दाखवतो जर एखादी व्यक्ती चालताना वाट चुकली किंवा तिला काही अडचण आली तर दांडेकर त्या व्यक्तीला तिच्या मूळ ठिकाणापर्यंत नेऊन सोडतो.