Asian Games 2023: मराठमोळा ऋतुराज गायकवाड झाला भारतीय संघाचा कॅप्टन


चीनमधील हांगझोऊ येथे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यावेळी या खेळांमध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या दोन्ही क्रिकेट संघांची घोषणा करण्यात आली आहे. पुरुष संघाचे नेतृत्व रुतुराज गायकवाड यांच्याकडे आहे. त्याचबरोबर संघात तरुण खेळाडूंचाही भरणा आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहणे विशेष ठरणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळाचा सहभाग असण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१० आणि २०१४ मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष किंवा महिला संघ कधीच पाठवले नाहीत. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, बांगलादेश आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले आहे आणि महिलांमध्ये, पाकिस्तानने दोन्ही वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. ( Indian men’s cricket team for Asian Games 2023 – full squad )

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी , शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).


आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कानू मणी, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी.