IND Vs AUS: टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला या मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. तर ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताच्या अनेक स्फोटक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेत आयपीएलदरम्यान खळबळ माजवणारी खेळाडू रिंकू सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय स्फोटक फलंदाज यशस्वी जैस्वालचाही संघात समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मालाही संघात स्थान मिळाले आहे. विश्वचषकादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीची बरीच चर्चा झाली होती, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली आहे.

एकदिवसीय विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळलेला भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. एकदिवसीय विश्वचषक संघात समाविष्ट 3 खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडूंना वगळण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णा हे तीनच खेळाडू आहेत जे विश्वचषकाचाही भाग होते आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार