राहुल द्रविडच्या जागी ‘हा’ अनुभवी खेळाडू बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाला दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारताला 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी आयर्लंड दौऱ्यावर तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात येणार आहे.
हा अनुभवी खेळाडू होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक
वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्याच्या संघाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्यासह त्याच्या प्रशिक्षक कर्मचार्यातील इतर सदस्यांना विश्रांती देण्यात येईल असं क्रिकबझकडून सांगण्यात आलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे.
Rahul Dravid & other coaching staff set to rested for Ireland series.
VVS Laxman will be the coach for 3 T20I. [Cricbuzz] pic.twitter.com/nzIIQi4BSg
— Johns. (@CricCrazyJohns) July 16, 2023
प्रशिक्षक राहुल द्रविडला आयर्लंडविरुद्ध विश्रांती देण्याचे मुख्य कारण म्हणजे 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी योग्य संघ संयोजन मिळण्यासाठी पुरेसा वेळ आहे याची खात्री करणे. आशिया कप 2023 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी, यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर असतील आणि सितांशु कोटक आणि हृषिकेश कानिटकर हे फलंदाजी प्रशिक्षक आणि ट्रॉय कुली आणि साईराज बहुतुले यांच्यापैकी एक गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याची शक्यता आहे. . गेल्या वर्षी जूनमध्ये भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला तेव्हा लक्ष्मण टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही, मात्र हार्दिक पांड्याला आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवलं जाऊ शकतं.