कोकणी माणूस व्यवसाय करायला शिकला याचा आनंद होतोय – नारायण राणे


भांडूप येथे कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणातील जनतेला व्यवसाय करण्याच आवाहान केलं. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, सालाबाद प्रमाणे कोरोनाचा काळ सोडून चालू असलेला सातत्याने 25 वर्ष हा महोत्सव सुरू आहे. हे २५वं वर्ष आहे. हा महोत्सव सुरू झाला की सुजय धरण सुरतचं आमंत्रण येणार आणि त्या महोत्सवाच्या निमित्ताने मी भांडुपच्या लोकांना भेटायला मिळणार हे निश्चित असतं त्याप्रमाणे यावर्षीही आमंत्रण आलं आणि मी आज महोत्सवाच्या निमित्ताने भांडुपच्या सर्व बंधू भगिनींच्या दर्शनासाठी भेटीसाठी आलो आहे. हा महोत्सव आता सुजय यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला  २५ स्टॉलने हा महोत्सव सुरू झाला आता त्यांनी सांगतलं की १२५ स्टॉल या वेळेला आहेत. ही सगळी किमया सुजय धरण त्यांचे सहकारी यांची आहे. भांडुपच्या जनतेने सुजयला गेले पंचवीस वर्ष दिलेल सहकार्य आहे या सहकार्यामुळे ही मदत तो गाठू शकला ही सर्व गर्दी दिसते आहे. हे सगळं स्वरूप पाहिल्यानंतर वैभव पाहिल्यानंतर बरं वाटतं आनंद वाटतो की भांडुपला या महोत्सवानिमित्त लोकांना काहीतरी विरंगुळा घालवायला संधी मिळत.

नारायण राणे पुढे म्हणाले, काल नितेश येऊन गेला नितेश आपल्याशी भरपूर बोलला असेल. महोत्सव हा मुंबईत सुरू करण्यामागचा माझा हेतू हा वेगळा होता. मुंबई आणि इकडे कल्याण पर्यंत वसईपर्यंत हे महोत्सव सध्या सुरू आहे पुण्यालाही महोत्सव सुरू असतो आणि आता दिल्लीलाही सुरू आहे. यातून काय साध्य झालं असं जर कोणी विचारलं तर त्याला उत्तर एकच आहे मराठी माणूस मालवणी माणूस व्यवसाय करायला शिकला त्याला व्यवसायाची सवय लागली पैसे मिळवायची सवय लागल्यामुळे आज व्यवसायास मराठी माणूस प्रगती करतोय पाऊस ऐकून मला आनंद सुरुवातीला आपल्या स्टॉलवर आपण उभ राहायला मराठी माणसाला मालवणी लोकांना लाज वाटायची मी कस काय विकायला उभा राहू पण आज स्टॉलवर उभ राहायला लाग वाटायची मे कसं काय विकायला उभ राहू पण आज पहायला तर आज माल विकता विकता आपण जाताना मराठी माणूस हाथ दाखवतो आणि म्हणतो दादा हा स्टॉल माझा आहे. बार वाटत ऐकून. आज व्यवसाय करून आपण प्रगती करतोय नाहीतर कोकणी माणूस जो मुंबई घ्यायचा हा नोकरीसाठी यायचा. यापुढे आपल्या पूर्वज मुंबईत राहायला आले आणि भांडुपला राहायला आले हे नोकरी निमित्त  व्यवसाय करायला किती जण आले असतील पण आता मात्र कुठे महोत्सव असू द्या सिंधुदुर्ग रत्नागिरीचे बरेच उद्योजक अशा महोत्सवाला येतात आपली दुकान लावतात.

कोकणातला निर्माण होणारा माल तिथे विकला जातो आणि आज आपलं कुटुंब चालवतात आपली प्रगती साध्य करतात आज कोकणामध्ये साक्षरतेचा प्रमाण ९०% च्या आहे. हा जो व्यवसायातून पैसा येतो तो मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातोय आणि मुलं चांगली शिकतायत वेगवेगळे व्यवसाय सुरू करतात आज कोकणामध्ये चालणारे बरेचसे व्यवसाय आपली स्थानिक माणसं करतात हे पाहून ऐकून बरं वाटतं त्यामुळे कोकण महोत्सवातून उद्योगाची सवय लावून घेणे आणि उद्योग करणे आणि आर्थिक सोबत प्राप्त करणे यामध्ये कोकणातला मराठी माणूस आता त्याला हा व्यवसाय करायला लागलेला आहे ही गोष्ट अतिशय चांगली आहे अशा आनंदाच्या प्रसंगी राजकारण करावा असं मला अजिबात वाटत नाही. सध्या मी केंद्रात आहे महाराष्ट्रात जागा शिवसेनेत असताना शाखाप्रमुख झालो नगरसेवक झालो बीएसटी चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री त्याननंतर परत आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री झालो एवढी सगळी पद तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला मिळाली अशी तुमच्याबद्दलची माझी समज आणि म्हणून मला तसं वाटतं आयुष्यात जेवढे जेवढे संधी मिळाली त्या संधीचा उपयोग कोकण आणि या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी आज पण त्याचा उपयोग करून या महाराष्ट्रातील जनतेला एक लोक कल्याणकारी राज्याची अवगत करावं यासाठी प्रयत्न करत असताना मी माझ्या खात्याचा पूर्ण उपयोग करतो. त्या वेळेला सिंधुदुर्गाच दरडोई उत्पन्न ३५ हजार रुपये होत आज दरडोई उत्पन्न सव्वा दोन लाख पर कॅपिटल उत्पन्न झालय. असं नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा