पुरात वाहून गेलेल्या प्रचिती कुडतरकरच्या कुटुंबाला ४ लाखाची शासकीय मदत, नितेश राणेंच्या हस्ते धनादेशाचे वितरण


कणकवली : तालुक्यातील शिरवल येथील ओहोळात बुडालेल्या प्रचिती कुडतरकर यांचे पती प्रशांत कुडतरकर यांना आमदार नितेश राणे यांच्या हस्ते 4 लाखांचा शासकीय निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. शिरवल येथील प्रशांत कुडतरकर यांच्या घरी जाऊन आमदार नितेश राणे यांनी धनादेश दिला.

यावेळी तहसीलदार आर.जे.पवार, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तलाठी अर्जुन गुणवत, महादेव बाबर आदी उपस्थित होते. घराजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या प्रचिती कुडतरकरचा बुडून मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या प्रचितीच्या वारस प्रशांतला सरकारने चार लाखांची मदत मंजूर केली होती. त्याचा धनादेश आज कुडतरकर यांना देण्यात आला.