ओरोस येथील बीएससी कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीची आत्महत्या!


सिंधुदुर्ग : ओरस येथील एका संकुलात राहणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाग्यश्री अनिल तांबे असे तिचे नाव असून तिच्या मागे फक्त आई आहे. सोमवारी सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर तिच्या बेडरूमचा दरवाजा तोडून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओरस पोलिसांनी त्याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्हटकर करीत आहेत. ओरोस येथे बीएससी कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीची आत्महत्यासिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कर्मचारी श्रीमती तांबे यांच्या त्या एकुलत्या एक कन्या होत्या. समाजकल्याण विभागात कार्यरत असलेले अनिल तांबे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला अनुकंपा खाली लागल्या होत्या. त्याची एकुलती एक मुलगी होती.

बीएससी कॉम्प्युटरचे शिक्षण घेतलेली भाग्यश्री यूपीएससीचे शिक्षण घेत होती. रविवारी रात्री जेवण करून ती आपल्या बेडरूममध्ये झोपायला गेली. मात्र रात्री तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बेडरूम उघडत नसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. आणि दरवाजा तोडून तिला मरण्यासाठी बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी ओरस पोलीस अधिक तपास करत आहेत. ( Girl Suicide In sindhudurg Oros )