कुत्र्याला फिरवण्याच्या वादातून गोळीबार, दोघांचा मृत्यू, सहा जखमी!
मध्यप्रदेश : इंदूर शहरातील खजराना पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा बाग कॉलनीत कुत्र्यांना फिरायला नेण्यावरून शेजाऱ्यांशी झालेल्या वादानंतर बँक गार्डने त्याच्या परवाना बंदुकीने गोळीबार केला. बँक ऑफ बडोदाच्या सुखलिया शाखेचे गार्ड राजपाल राजावत यांनी घराच्या छतावरून प्रथम दोन हवाई गोळ्या झाडल्या. यानंतर जमावावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये तेथे उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जखमी आहेत. मयत राहुल महेश वर्मा(28) आणि विमल देवकरण (35) बचावासाठी आले होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली.
आरोपी राजपालला अटक करण्यात आली आहे. त्याची बंदूक आणि परवानाही जप्त करण्यात आला आहे. विमल यांचे निपानिया येथे आरोपी व मृतकाच्या घरासमोर सलून आहे. त्याचा विवाह मयत राहुलची बहीण आरती हिच्याशी 8 वर्षांपूर्वी झाला होता. त्याला दोन मुली आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजता आरोपी गार्ड राजपाल कुत्र्याला फिरवत होता. यादरम्यान दुसरा कुत्रा आला आणि दोन्ही कुत्र्यांची मारामारी सुरू झाली. यावेळी एका कुटुंबाने आक्षेप घेतल्यावर वादावादी झाली. वाद वाढल्यावर सुरक्षारक्षक घराकडे धावला आणि बंदुक घेऊन पहिल्या मजल्यावर पोहोचला आणि गोळीबार सुरू केला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. राहुल आणि विमल यांना गंभीर अवस्थेत एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ज्योती (30) पती राहुल, सीमा (36) कमल (50) मोहित (21) ,ललित (40) आणि प्रमोद हे सर्व जखमी झाले असून उपचारासाठी एमवायएचमध्ये दाखल आहेत.