दिल्लीच्या IGI स्टेडियमजवळ भीषण रस्ता अपघात, 4 स्कूल बसेसची टक्कर
देशाची राजधानी दिल्लीतून दिल्लीत भीषण रस्ता अपघात झाल्याची बातमी येत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) स्टेडियमजवळ सोमवारी चार स्कूल बसेस एकमेकांवर आदळल्या. आयजीआय स्टेडियमजवळ कार आणि ऑटोची धडक झाल्याची घटना घडली. यानंतर या धडकेमुळे चार स्कूल बस एकमेकांवर आदळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बसमधील मुले खिडक्यांमधून बाहेर फेकली गेली. त्याचबरोबर या अपघातात काही मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी मुलांना उपचारासाठी लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयजीआय स्टेडियमच्या गेट क्रमांक-13जवळ हा अपघात झाला. बसमधील मुले शाळेत जात होती. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये लोक बसच्या खिडक्यांमधून मुलांना बाहेर काढताना दिसत आहेत.
#Delhi इंदिरा गांधी स्टेडियम के सामने कुछ देर पहले स्कूल बसों में टक्कर। खिड़कियों से बाहर निकले बच्चे। इस दौरान वीआईपी रूट भी लगा हुआ था। हादसे में कई वाहन क्षतिग्रस्त हुए हैं। @SandhyaTimes4u @NBTDilli #Delhiaccident #DelhiPolice pic.twitter.com/hXKqpTOHE8
— Kunal Kashyap (@kunal635) January 30, 2023
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उपस्थित लोकांनी मुलांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. ही घटना सकाळी घडली. या अपघातात बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर मुलांचे पालकही चिंतेत पडले. घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालकही घटनास्थळी धावले. सध्या जखमी मुलांबाबत फारशी माहिती नाही.
याआधी 8 जानेवारीच्या रात्री दिल्लीत दोन रस्ते अपघात झाले होते. दोन वेगवेगळ्या अपघातात 17 वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यू झाला. पहिला अपघात तिमारपूर भागात घडला जिथे क्लस्टर बसने दुचाकीस्वार गोपी कुमार (24) यांना चिरडले. गोपीचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, दुसरी घटना पूर्व दिल्लीतील मधु विहार भागात घडली. येथे दुचाकीस्वार डीटीसी बसच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झाला.