प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन


अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं’, असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्व्हाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे’, असं त्यात लिहिलं आहे. अवघ्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

या बातमीने केवळ चाहतेच नाही तर संपूर्ण मनोरंजन उद्योगाला धक्का बसला आहे. अचानक ही दुःखद बातमी समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. अभिनेत्रीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही धक्कादायक बातमी काही काळापूर्वी समोर आली आहे. पूनम पांडेच्या ताज्या पोस्टने आता संपूर्ण जगाला मोठा धक्का दिला आहे.

पूनम पांडेच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या निधनाचे सत्य मान्य केलेले नाही तर काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)