उर्फी जावेद आहे करोडोंची मालकीण! संपत्ती जाणून तुम्हाला धक्का बसेल


बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. लोकांना तिची असामान्य ड्रेसिंग स्टाईल आणि तीचा लुक आवडतो आणि यामुळे उर्फी जावेद खूप चर्चेत राहते. तिचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात.

उर्फी जावेद ही उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊची रहिवासी आहे. 15 ऑक्टोबर 1996 रोजी जन्मलेल्या उर्फीची शैली वेगळी आहे. बडे भैया की दुल्हनियामध्ये अवनी पंतची भूमिका साकारल्यानंतर उर्फी प्रसिद्धीच्या झोतात आली. 2016 मध्ये टेलिव्हिजन जगतात प्रवेश करणाऱ्या उर्फीने अनेक शोमध्येही काम केले आहे. ती नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. यामुळे अनेकवेळा तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. उर्फी जावेदची एकूण संपत्ती काय आहे ते जाणून घेऊया.

उर्फी जावेदने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, बेपन्ना, जीजी माँ, दायन, रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्फी अनेक वर्षांपासून टीव्हीच्या दुनियेत सक्रिय आहे. आता उर्फी जावेद आलिशान जीवनशैली जगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

फॅशन दिवा उर्फी जावेदने सर्वांना मागे सोडले आहे. तिची फॅशन पाहून लोकांचे डोळे उघडे राहतात. उर्फीच्या एकूण संपत्तीचा कुठेही उल्लेख नाही, परंतु काही अहवालांनुसार, त्याच्याकडे कोटींची संपत्ती आहे. एका रिपोर्टनुसार उर्फी जावेदकडे जवळपास 170 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती दर महिन्याला दोन ते पाच लाख कमावते, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. उर्फी अभिनय, मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून भरपूर कमाई करते. उर्फी जावेद सोशल मीडियावर ब्रँड एंडोर्समेंटसाठी भरीव फी देखील आकारते. उर्फीने मुंबईत एक आलिशान फ्लॅट घेतला आहे ज्यात ती राहते. उर्फीचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.