Dinesh Karthik : दिनेश कार्तिकचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम


Dinesh Karthik Retirement: एकीकडे टीम इंडिया 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कमध्ये सराव करत असताना दुसरीकडं टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलीय. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं शनिवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतलीय.

दिनेश कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर त्याच्या निवृत्तीबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये कार्तिकनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत मिळालेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी

दिनेश कार्तिक आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. कार्तिकनं आरसीबीमध्ये फिनिशरची भूमिका शानदारपणे बजावली. आयपीएल 2024 मध्ये कार्तिकनं आपल्या शानदार फलंदाजीनं चाहत्यांचं भरपूर मनोरंजन केलं आयपीएल 2024 मध्ये दिनेश कार्तिकनं 15 सामन्यात 326 धावा केल्या होत्या. एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनीही कार्तिकला निरोप दिला.

कार्तिकची क्रिकेट कारकीर्द

दिनेश कार्तिकनं टीम इंडियासाठी 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. दिनेशच्या नावावर कसोटीत 1025 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1752 धावा आणि टी-20 क्रिकेटमध्ये 686 धावा आहेत. याशिवाय कार्तिकने प्रथम श्रेणीतील 167 सामन्यात 9620 धावा केल्या होत्या.