खरीप हंगाम २०२३ ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करा


सिंधुदुर्ग : खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन गुगल व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॕपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॕपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. आपल्या पिकांची नोंदणी केली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी पूर्ण करावी, जेणेकरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.