सावंतवाडीच्या मोती तलावात पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव


सावंतवाडी : मोती तलावात Moti Lake  एक महिला पडल्यानंतर तिने झाडाची फांदी पकडून जीव वाचवण्यासाठी हात उंचावून मदतीची याचना केली. काही नागरिकांनी हे पाहिल्यावर परिस्थिती लक्षात घेऊन तलावातील बोटीच्या सहाय्याने त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला.

सावंतवाडीचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अजय मांजरेकर, संजय म्हापसेकर, रवी मडगावकर, प्रल्हाद तावडे, सुनील राऊळ तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण वालावलकर, नाईक, जगदीश दुधवडकर यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

महिलेला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर महिला खासकिलवाडा भागातील असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांच्या पुढाकाराने या महिलेचा जीव वाचला. ( Citizens saved the life of a woman who fell in Moti Lake of Sawantwadi )