भारत-पाक सामन्याची क्रेझ शिगेला, अहमदाबादमध्ये हॉटेलचे भाडे 1 लाखांपर्यंत


भारत आणि पाकिस्तानचे संघ १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर शहरातील हॉटेल रूमचे दर जवळपास १० पटीने वाढले आहेत.

वेगवेगळ्या हॉटेल बुकिंग वेबसाईट १५ ऑक्टोबरसाठी रूमच्या दरात मोठी वाढ होऊ शकतात असा अंदाज लावत आहेत. शहरातील काही आलिशान हॉटेल्स एका खोलीसाठी ५० हजार ते १ लाख रुपये आकारत आहेत. सामान्य दिवसांमध्ये अहमदाबादमधील लक्झरी हॉटेल्समध्ये रुमचे भाडे ५,००० ते ८,००० रुपयांपर्यंत असते.