अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते अजित पवार यांनी रविवारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभात छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभेत राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार असून त्यापैकी 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.
NCP leader Ajit Pawar takes oath as the Deputy Chief Minister of Maharashtra at Raj Bhawan. pic.twitter.com/fs3Tn65LLD
— ANI (@ANI) July 2, 2023
शपथविधीपूर्वी अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यात त्यांनी पक्षाचे काही नेते आणि आमदारांची भेट घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे उपस्थित होते.