६० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला चिमुकला, NDRFची टीम घटनास्थळी दाखल


हापूरमध्ये खेळत असताना एक ४ वर्षांचा मूकबधिर मुलगा सुमारे ६० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. बालक पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज सतत येत आहे. हापूर नगरपालिकेची ही बोअरवेल आहे. ही घटना मोहल्ला फूल गढी येथील आहे. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या टीमने मदतकार्य सुरू केले आहे.

जिल्हा दंडाधिकारी मेधा रुपम यांनी मदतकार्याची माहिती माध्यमांना दिली आहे. मदतकार्य सुरू असून बाळाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, एनडीआरएफची टीम बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करत असून, सध्या बोअरवेलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी डीएम, पोलिस प्रशासनाची टीम आणि एनडीआरएफची टीम आहे.

या घटनेबाबत एसपी दीपक कुमार म्हणाले, ‘तीन तासांपूर्वी मूकबधिर मूल बोअरवेलमध्ये पडला. याची माहिती मिळताच अर्ध्या तासात एनडीआरएफ आणि प्रशासनाची टीम वाचवण्यासाठी पोहोचली. मुलगा प्रतिसाद देत आहे, दुधाची बाटली खाली पाठवली आहे. बोअरवेल खोल आणि अरुंद आहे, टीम मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा