समृद्धी एक्स्प्रेस वेवर बसला भीषण आग, 2५ प्रवासी जळून खाक……!


बुलढाणा येथे शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला समृद्धी द्रुतगती मार्गावर सिंदखेडजवळ अपघात झाला. यानंतर बसमध्ये मोठी आग लागली. या अपघातात बस जळून खाक झाली असून २६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण भाजले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सिटी लिंक ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूरहून पुण्याकडे जात होती, त्यात चालकासह ३४ प्रवासी होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडजवळ अचानक बसचा टायर फुटला, त्यामुळे समृद्धी द्रुतगती मार्गावर गाडी पलटी होऊन डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला. बसला लागलेल्या भीषण आगीत २६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण या आगीत गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की बस पूर्णपणे जळून खाक झाली असून त्यातील प्रवासी जळून ठार झाले आहेत. मात्र, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली.

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

या अपघातावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.