भारतीयांची मान उंचावणारा दिवस – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई: भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे ‘चांद्रयान ३’ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारतीयांनी देखील एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. राज्यात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी ‘चांद्रयान ३’ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील वसंतराव नाईक चौक गार्डन ताडदेव सर्कल, मलबार हिल येथे झाला.
“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, त्यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांवर दाखवलेला दृढ विश्वास आणि या मोहिमेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्वच लोकांमुळे आज १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा क्षण आहे. चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण अनुभवताना प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला असणार हे नक्की आहे, असेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
नवभारताचा आणखीन एक नवा विक्रम!
आत्मनिर्भर भारताचे चांद्रयान 3 आज चंद्रावर उतरले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व हा क्षण साजरा करण्यासाठी मुंबईतील वसंतराव नाईक चौक गार्डन ताडदेव सर्कल, येथे माझ्या मतदारसंघातील नागरिकांसाठी चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण… pic.twitter.com/EdHJpuwUZZ
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 23, 2023