पोलीस पथकावर काळाचा घाला; दोघांचा जागीच मृत्यू तर तिघांची प्रकृती चिंताजनक


एका गुन्ह्याच्या तपासासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर काळाने घाला घातला. अंजनी धरणाजवळ एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी जळगावहून एरंडोल-कासोदाकडे जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वाहनावर झाड पडले. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यामध्ये चालकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

एका गुन्ह्याच्या तपासासाठी ५ जणांचे पथक असलेले पोलिसांचे वाहन कसौदा येथे जात होते. दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास अचानक एक मोठे झाड त्यांच्या गाडीवर पडले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चालकाचा मृत्यू झाला. कारमधील अन्य ३ कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कसौदा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.