सावंतवाडीतील तरुणीची ऑनलाईन फसवणूक, घातला ५ लाखांचा गंडा


सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील मधील सालईवाडा येथील सर्वोदयनगर भागामधून एक ऑनलाईन फसवणूकी ची घटना समोर आली आहे. सायली प्रदीप कोरगावकर या तरुणीला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 5 लाख 16 हजार 879 रुपयांचा गंडा घातला आहे.

सायली प्रदीप कोरगावकर हीला व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन पैसै कमवण्या संदर्भात एक मेसेज आला. युट्युबचे सबस्क्राइबर्स वाढवण्याचे ऑनलाईन टास्क ३ तासात पूर्ण केल्यास तुम्हाला १५० रूपये मिळतील. असे या मेसेजमध्ये लिहिले होते. मेसेजला बळी पडून पीडित तरुणीने काही टास्क पूर्ण केले आणि तरुणीने 5 लाख 16 हजार 879 रुपये जमा केले. मात्र तिला गुन्हेगारांने फक्त 16 हजार रुपयेच परत केलेत.

या प्रकारानंतर आरोपीने पीडित व्यक्तीचे फोन उचलणे बंद केले आणि संपर्क तोडला. त्यानंतर पीडित व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याची खात्री पडली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ( Youtube Like and Subscribe scam on WhatsApp in Sawantwadi )