२०२४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला पाचपेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत – नारायण राणे


पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाचपेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी (29 जून) केला. पाठिंबा मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेत आहेत याचा समाचार घेत राणे म्हणाले की, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे कधीही इतर राजकीय नेत्यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी त्यांची भेट घ्यायला गेले नाहीत.

देशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्न सुरू आहेत. राणे म्हणाले की केंद्र सरकारने आदिवासींसाठी आणि एससी आणि एसटी समुदायातील उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री राणे पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भारतीय जनता पक्ष (BJP) पासून दूर गेली आणि महाविकास आघाडी (MVA) सरकार स्थापन करण्यासाठी NCP आणि काँग्रेससोबत युती केली.

गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड पुकारले होते. त्यामुळे पक्षात फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील MVA सरकार पडलं. शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार मजबूत होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता केवळ १३-१४ आमदार उरले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची संख्या पाच आमदारांपेक्षा कमी होईल.