गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त 156 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई, पनवेल, पुणे येथून रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत गाड्या धावतील. 27 जूनपासून बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून करता येईल. यासाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. NTES अॅप किंवा www.enquiry.gov.in या वेबसाइटवरून विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेची माहिती मिळेल.
गणपती उत्सव साठी मध्य रेल १५६ विशेष गाड्या चालवेल
तिकिट बुकींग २७/०६/२०२३ पासुन सुरू होइल१) ०११७१/७२ CSMT- सावंतवाडी विशेष – ४० फेऱ्या
२) ०११६७/६८- LTT- कुडाल विशेष- २४ फेऱ्या
३) ०११६९/७० पुणे – कर्मालि / कुडाल विशेष- ६ फेऱ्या.#गणपती_विशेष #GanpatiSpecialTrain pic.twitter.com/6pftWh6Jpk
— MUKESH PAWAR (@Pawar_MukeshC) June 24, 2023
४) ०११८७/८८- कर्मालि – पणवेल – कुडाल विशेष- ६ फेऱ्या.
५) ०११५३/५४- दिवा – रत्नागिरी विशेष- ४० फेऱ्या
६) ०११५१/५२- CSMT- मडगाव विशेष- ४० फेऱ्या
सर्व भाविकांना, प्रवासी यांना विनंती आहे की त्यांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा.#GanpatiSpecialTrain #गणपती @Central_Railway pic.twitter.com/ddB92FgCGO
— MUKESH PAWAR (@Pawar_MukeshC) June 24, 2023
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोडींची अचूक आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सिंधुदुर्ग वार्ता’ न्यूज वेबसाईटच्या Whatsapp ला Join व्हा