वाढदिवसाच्या 10 दिवस आधी घेतला जगाचा निरोप, जाणून घ्या तुनिषाबद्दलच्या खास गोष्टी


आयुष्य खूप सुंदर आहे, प्रत्येकाला ते शेवटपर्यंत जगायचं असतं, पण कधी कधी एखादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने इतकी अस्वस्थ होते की त्याला आयुष्य संपवण्याचा मार्गच सुचतो. २० वर्षांच्या तुनिषा शर्मासोबतही असंच काहीसं घडलं. खरंतर आज तुनिषाचा २१ वा वाढदिवस आहे. मात्र, तुनिषाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हापासून तिने आपला वाढदिवस साजरा केला नाही. तुनिषाने १० दिवसांपूर्वी शोच्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर चित्रपटसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. या वाढदिवसानिमित्त तुनिषाच्या आणखी काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

आजपासून १० दिवस आधी म्हणजे २४ डिसेंबरच्या संध्याकाळी, अलिबाबा दास्तान-ए-काबुल या टीव्ही शोची लीड अभिनेत्री सेटवर गळफास लावून आत्महत्या करेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. तुनिषाच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याआधी तिच्या आईने आरोप केला होता की तुनिषाचा शोमधील को-स्टार शीजानसोबत अफेअर होते आणि तो तिची फसवणूक करत होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी शीजनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांनी शीजानला न्यायालयात हजर केले आणि कोठडी वाढवण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने शीजनच्या कोठडीत १४ दिवसांची करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषाच्या मृत्यूच्या काही दिवसांनी शीजनसोबतचा एक फोटो समोर आला, ज्यामध्ये दोघेही गणपतीची पूजा करताना दिसत होते. यावेळी तुनिषाने हिजाब परिधान केला होता. यानंतर अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी लव्ह जिहादचा कोन समोर ठेवला. तुनिषाचे मामा पवन शर्मा म्हणतात की शीजान आणि तुनिषाचे प्रकरण लव्ह जिहादचे आहे. शीजन त्याला धर्मांतर करण्यास सांगत होता. पोलीस मात्र धर्मांतराची बाब नाकारत आहेत.पोलिसांनी लव्ह जिहादच्या अँगलला नकार दिल्यानंतरही तुनिषाचे मामा लव्ह जिहादबद्दल बोलत आहेत. दुसरीकडे, शीजानच्या बहिणींचे म्हणणे आहे की, तुनिषाचे त्यांच्या आईसोबत चांगले संबंध नव्हते. ती तुनिषाला कामासाठी बळजबरी करायची. शीजानच्या बहिणीने सांगितले की, तो तुनिशाला आपली बहीण मानायचा. आणि तुनिषाच्या आईने केलेले आरोप खोटे आहेत.

तुनिषाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, तुनिशा शर्माने वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने सोनी टीव्हीवरील महाराणा प्रताप ही पहिली मालिका केली. त्यानंतर तिने चक्रवर्ती अशोक सम्राट ही दुसरी मालिका केली. यामध्ये तिने राजकुमारी अहंकाराची भूमिका साकारली होती.