कुडाळात अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती


सिंधुदुर्गनगरी : तरुण पिढी ही भारताचे भविष्य आहे, तरुण- तरुणींनी अंमली पदार्थांचा धोका ओळखून त्यापासून स्वतचा व इतरांचा बचाव करण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे संपूर्ण कसे जीवन उध्वस्त होते, त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबावर तसेच समाजावर होतात त्यामुळे तरुण पिढीला अंमली पदार्थाचा सेवनापासून रोखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन ॲड मिनाक्षी नाईक यांनी केले.

दि. 26 जून 2023 रोजी अंमली पदार्थाचा गैरवापर आणि तस्करी विरुध्द आंतराष्ट्रीय दिवस निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत पुप्षसेन सावंत जुनिअर कॉलेज हुमरमळा ता. कुडाळ, येथे सकाळी 11 वाजता जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव अ.बा. कुरणे, पुष्पसेन सावंत जुनिअर कॉलेज हुमरमाळाचे प्राचार्य दि.दि.परब, ॲड .सुवर्णा हरमलकर लोकभिरक्षक सिंधुदुर्गच्या अॅड. श्वेता तेंडुलकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अँड. मिनाक्षी नाईक म्हणाल्या, तस्करीला बळी पडलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून त्यांनी कायद्याबाबत माहिती दिली.

अँड. सुवर्णा हरमलकर यांनी मनुष्य तस्करी म्हणजे काय त्याला बळी पडू नये यासाठी काय दक्षता घ्यावी याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे नालसा योजना (तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाचा बळी ), 2015 सविस्तर माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अ.बा कुरणे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून दिला जाणारा सल्ला व सहाय्य या विषयी माहिती दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोडींची अचूक आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सिंधुदुर्ग वार्ता’ न्यूज वेबसाईटच्या Whatsapp ला Join व्हा 👇

https://chat.whatsapp.com/EhO0BsRA3psDTfgRfYIwro