विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान


आयसीसीने ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा पाकिस्तानशी सामना होणार आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. हा सामना ५ ऑक्टोबरला होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धचा सामना ११ ऑक्टोबरला होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. मसुद्यानुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तान संघ भारताविरुद्ध खेळू इच्छित नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यांनी सुरक्षेचे कारण सांगितले. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये अदलाबदल व्हावी, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे.