समुद्राच्या आतमध्ये काय आहे? किती खोल असतो समुद्र? वाचा…
समुद्राखाली काय आहे? समुद्र किती खोल असतो? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो जर तुम्हाला स्वतः समुद्राखाली जाऊन ही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला लाखो रुपये ज्याच्या मदतीने तुम्ही समुद्रातील सर्वात खोल जागी चॅलेंजर्स डीप मध्ये पोहोचाल आणि तिथून तुम्हाला समुद्राच्या खाली काय आहे ते पाहता येईल. यामुळे आजच्या या लेखात समुद्राच्या खाली काय आहे आणि समुद्र किती खोल आहेत हे आपण बघणार आहोत. पृथ्वीच्या 71 टक्के भागात महासागर पसरलेला आहे. ज्याच्या आत अनेक रहस्य सामावलेली आहेत. आजपर्यंत मानव फक्त पाच टक्के महासागर पाहू शकलाय तर उर्वरित महासागरात काय लपलेलं आहे याची कोणालाच कल्पना नाही. पण तरीही तुम्ही समुद्राच्या पाण्याच्या आत काय आहे याचा कधी विचार केला होता का? लाखो करोडो अगणित जीवांनी भरलेला हा महासागर स्वतःमध्ये कितीतरी गोष्टी सामावून बसला आहे. समुद्राच्या खाली काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की महासागर तयार झाला कसा आणि तो पृथ्वीच्या इतक्या मोठ्या भागावर केव्हा आणि कसा पसरला?
विज्ञानानुसार आज पासून चार अब्ज वर्षांपूर्वी महासागराचा जन्म झाला असावा. लघूग्रह आणि उल्का यांच्याट टक्कर झाली त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर महाकाय विवर तयार झाले होते. पृथ्वी थंड झाल्यावर तिच्यावर वायूचे ढग तयार होऊ लागले त्यामुळे पृथ्वीवर सलग अनेक महिने मुसळधार पाऊस पडला. आणि पृथ्वीवरचे सर्व खड्डे भरले गेले अशा प्रकारे पृथ्वीवर विविध मार्गांनी साचलेल्या पाण्याने महासागराचे रूप धारण केले. पॅसिफिक महासागर हा महासागरातील सर्वात खोल महासागर मानला जातो समुद्राखाली अनेक प्रकारचे प्राणी जीव जंतू आणि मासे राहतात. जे मानवाला पाहणे देखील शक्य नाही माणसाने आजपर्यंत पाहिलेल्या सर्व सागरी प्राण्यांपैकी फक्त 5 टक्क्यांपेक्षा कमी प्राणी बघितलेले आहेत. खरंतर समुद्रात किती प्रकारचे प्राणी आणि त्यांच्या विविध प्रकारच्या प्रजाती राहतात याच्याबद्दल शास्त्रज्ञांनी नीट अंदाज लावू शकत नाही. समुद्राच्या आत बुडबुड्यांसारख्या हलक्या प्राण्यांपासून हत्तीच्या वजनाइतके जड प्राणी राहतात जे मानवी डोळ्यांनी पाहणे देखील अशक्य आहे. आज रोजी प्रकाश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञांना पृथ्वीवर शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या समुद्राच्या आतील अशा रहस्यमय जीवांचा शोध लावण्यात यश आलं आहे. केवळ प्राणीच नाही तर अनेक प्रकारची झाडे वनस्पती आणि जीवजंतू देखील समुद्राच्या आत आहेत. जे पृथ्वीला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन पुरवतात तेवढेच नाही तर समुद्राच्या खोल भागात आश्चर्यकारक आणि विचित्र पाहायला मिळत झाडे वनस्पती आणि जीवाणू आहेत जे पाहून वैज्ञानिकही आश्चर्यचकित झालेत.
केवळ पाच टक्के महासागरात पाच हजारांहून अधिक विविध प्रजातींचे जिवाणू, विषाणू आणि दीड लक्षहून अधिक सेल्युलर वनस्पती आहेत. यावरून पृथ्वीवरील 71 टक्के सागरी भागात कोणते आणि किती प्रकारचे जिवाणू आणि विषाणू असतील याची कल्पना येऊ शकते. समुद्रात व्हेल आणि शार्क व्यतिरिक्त अनेक महाकाय माशांच्या प्रजाती आहेत. जे दिसायला देखील खूप भीतीदायक आहेत. शास्त्रज्ञांच्या मते समुद्रात खोलवर ड्रॅगन सारखे महाकाय दिसणारे मासे राहतात तर तेजस्वी डोळे आणि भयानक जबडे असलेल्या विविध माशांच्या प्रजातींचे वास्तव्य आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की समुद्राखाली अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे रंग बदलतात त्यापैकी काही पूर्णपणे पार दर्शक असतात. समुद्रात इतके मासे आहेत की रोज लाखो मासे पकडले तरी त्यांची फारशी संख्या कमी होणार नाही. तरी त्यांची फारशी संख्या कमी होणार नाही. या समुद्रात केवळ माशांच्याच नव्हे तर महाकाय सापांच्या देखील लाखो प्रजाती राहतात त्यापैकी काही अत्यंत विषारी आणि धोकादायक आहेत. तसं बघितलं तर समुद्राच्या आत सापांना शोधणं स्वतःच एक आव्हान आहे. कारण समुद्री साप अनेकदा खडक आणि जलीय वनस्पतींमध्ये लपलेले असतात. शास्त्रज्ञांच्या मते समुद्रात ऑक्टोपसच्या अनेक प्रजाती राहतात याशिवाय विविध प्रकारच्या जातींचे कीटकही इथे राहतात. समुद्राचा सर्वात खोल भाग पश्चिम पॅसिफिक महासागरात अस्तित्वात आहे. ज्याला मारियाना ट्रेंच म्हणून ओळखले जाते. या ठिकाणच्या सर्वात खोल बिंदूला चॅलेंजर टीप असे म्हणतात. ज्याची खोली दहा हजार 902 ते दहा हजार 929 मीटर पर्यंत मोजली गेली आहे. समुद्राच्या या खोल जागी इतका अंधार आहे की तिथे काहीही पाहण्यासाठी खास चश्माचाच उपयोग करावा लागतो या ठिकाणी सूर्य प्रकाश किंवा कोणताही कुत्रीम प्रकाश पोहोचू शकत नाही. तरीपण प्रकट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञ या क्षेत्रावर नेहमीच लक्ष ठेवून असतात.
इथल्या पाण्याचा दाब इतका जास्त आहे की कोणत्याही सामान्य माणसाला इथपर्यंत पोहोचणार आणि तिथून जिवंत परत येणे खूपच कठीण आहे. यामुळेच आतापर्यंत मोजकेच लोग या जागी गेले आहेत. समुद्राचा हा भाग एव्हरेस्टच्या शिखरापेक्षाही खोल आहे म्हणजेच की संपूर्ण एव्हरेस्टचा डोंगर उचलून खोलवर फेकला तर तो यात बुडून तीन हजार ते चार हजार मीटर एवढी जागा आणखी राहील तेवढेच नाही तर समुद्राच्या खोल जागी जाण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो.
महासागरातील पाण्याच्या खोलींचा व त्याच्या वैशिष्ट्यांचा विचार करून पाच भाग पाडले गेले त्यातील पहिला भाग म्हणजे एपीपी लॅजीक झोन हा झोन समुद्राच्या पृष्ठभागापासून ते आज खोल 200 मीटर पर्यंत पसरलेला असतो. त्याच्या नावाप्रमाणेच त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या स्तरात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात पोहोचतो. त्यामुळे या भागात जलचर आणि पाण वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि येथे सी डायव्हर्स आरामात आनंद घेऊ शकतात.
दुसरा स्तर म्हणजे मेजॉपी लॉजिक्स होऊन आज होऊन 200 मीटर ते 1000 मीटर पर्यंत पसरलेला आहे या भागात सूर्यप्रकाश दुर्मिळ प्रमाणात उपलब्ध असतो. इथे काही दुर्मिळ माश्यांच्या प्रजाती आढळतात आणि हा भाग सी ड्रायव्हर साठी अत्यंत धोकादायक आहे. या भागात खोल जाताना समुद्रातील गोताखोरांनी खबरदारी घेतली नाही तर पाण्याच्या दाबामुळे त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग काम करणे बंद करतील. पण या सगळ्यांना न भिता हर्बर्ट नेचर या ऑस्ट्रेलियन फ्री ड्रायव्हरने 214 मीटर खोलीवर डायव्हिंग करून विश्वविक्रम केला होता. आणि हरबळनेर हा संपूर्ण विक्रम अवघ्या एका दमात केला होता तिथून आणखी खाली गेल्यावर 332 मीटर खोलीवर स्कुबा डायविंग करण्याचा विश्वविक्रम आहे आणि हा विश्वविक्रम इजिप्त मधल्या अहमद कवर यांनी केलाय.
तिसरा स्तर म्हणजे बॅथिपे लॉजिक्स झोन किंवा मिडलाईट झोन असून यालाच डार्क झोन असेही म्हटलं जातं. या समुद्राच्या स्तराला सूर्यप्रकाश अजिबातच पोहोचत नाही. सर्वत्र फक्त अंधार पसरलेला असतो हा भाग समुद्राच्या खोलीच्या 1000 मीटर पेक्षा चार हजार मीटर पर्यंत पसरलेला असतो या भागात पाण्याचा दाब हा पंधराशे पीएसआय वर असतो. म्हणजेच एखादी म्हैस नाण्यावर उभी राहते तितकादा दाब पण तरीही स्पेन हेल सारखे काही जलचर भक्षाच्या शोधात या भागात वावरताना आढळतात. आणखी खाली तेराशे मीटरवर तर लेटर बॅक सीट कासव आढळतात हे कासवे जगातील सर्व कासवांपेक्षा मोठे असून त्यांचे वजन 700 किलो पर्यंत असते. 2000 मीटर खोलीवर काळा ड्रॅगन मासा आढळतो त्याचा रंग समुद्रातील अंधारा इतका पूर्णपणे काळा आहे. फक्त जो फ्लॅश लाईटनेस दिसू शकतो. पण त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते की तो अंधारातही सहज पाहू शकतो.
चौथा झोन आहे अॅबीसोप्लॅजिक झोन हा झोन 4000 मीटर ते सहा हजार मीटर पर्यंत पसरलेला आहे आश्चर्य म्हणजे येथील पाण्याचा दाब 11000 पीएसआय पर्यंत होतो म्हणजेच एक जड हत्ती एक रुपयाच्या नाण्यावर उभा राहील तेवढाच ताप इथे आहे आणि येथील भागात विचित्र प्राणी आणि वनस्पती आढळतात या भागात नायट्रोजन फॉस्फरस आणि सिलिका यांसारख्या पौष्टिक क्षारांचे प्रमाण जास्त आहे कारण मोठ्या प्रमाणात मृतप्राणी आणि सेंद्रिय पदार्थ वरील महासागरामधून वाहून खाली येतात. आणि येथे विघटित होतात येथे सूक्ष्मजीव कृष्टेशियन मोळ स्कॅन आणि विविध प्रकारचे मासे आढळतात येथे असे प्राणी आढळतात ज्यांचा अजून शोध लागलेला नाही. येथे ट्रायपॉड फिश डंबो ऑक्टोपस कस येईल ओबीसील ग्रॅनाईट इयर पॅरिस व्हेरी इत्यादी प्रकारचे प्राणी आढळतात.
पाचवा आणि शेवटचा झोन म्हणजे हॅडल्स झोन सर्वात खालचा आणि सर्वात खोल झोन आहे. हा झोन आज होऊन सहा हजार मीटर ते खाली सर्वात खोल तळापर्यंत पसरलेला असतो. समुद्राच्या तळाच्या या भागात पाण्याचा दाब अतिप्रचंड असतो इतका की तो एका झटक्यात एक बुलेट प्रूफ कार फडू शकतो या झोन पुढे गेल्यावर सहा हजार पाचशे मीटरची खोली म्हणजे ती खोली ज्यामध्ये अमेरिकेच्या नौदलाच्या संशोधन पाणबुडी जाऊ शकते त्या पाणबुटीचे नाव आहे डी एस एल व्ही आणि तीच समुद्री सब मरीन आहे ज्याने टायटॅनिक शोधून काढला होता. यानंतर दहा हजार 890 मीटर खोलीवर जेम्स कॅमरानने 2012 मध्ये आपल्या पाणबुडीसह जाण्याचा पराक्रम केला पण 1960 मध्ये आधीच दोन माणसांनी येथे जाण्याचा पराक्रम केला होता त्यांचं नाव डॉन बॉल्स आणि जॅक स्पिकआर्ट अशी आहे हे दोन्ही टीयर्स नाव मी पाणबुडीत दहा हजार 900 मीटरच्या खोलीत गेले होते. पाणबुडीला इथपर्यंत पोहोचायला पूर्ण पाच तास लागले. पण इथल्या पाण्याचा दाब इतका जास्त होता की पाणबुडीचा एक भाग फुटला आणि त्यांना लगेच वर जावं लागलं समुद्राच्या पृष्ठभागावरून 11 हजार मीटर किंवा 35 हजार फूट खाली गेल्यावरही संशोधकांचा असा विश्वास आहे की हा महासागराचा शेवटचा बिंदू नाही की हा फक्त एवढाच भाग आहे की जिथे आतापर्यंत माणूस जाऊ शकलाय आणि माणसाने आतापर्यंत जे काही महासागरात पाहिले ते फक्त पाच टक्के महासागरच आहे. असं मानलं जातं म्हणजेच की समुद्राच्या 95% भागात कोणती रहस्य दडली आहेत हे अजून कोणालाच माहीत नाही.