शुभमन गिलच्या नावावर मोठा विक्रम, कोहलीला टाकलं मागे


न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिलने आणखी एक शतक झळकावले. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील चौथे शतक आहे. या खेळीसह शुभमन गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर त्याने कोहलीचा विक्रमही उद्ध्वस्त केला आहे.

शुभमन गिलने 78 चेंडूत 112 धावांची खेळी केली. गिलने आपल्या खेळीत  चौकार आणि पाच षटकार मारले. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलने 208 धावा केल्या, तर दुसऱ्या वनडेतही त्याने नाबाद 40 धावा केल्या. शुभमन गिलने तीन सामन्यांत 360 धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने विराट कोहलीचा 283 धावांचा विक्रम मागे टाकला असून द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला आहे. विराट कोहलीने 2023 मध्येच श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 283 धावा केल्या होत्या. कोहलीने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 263 धावा केल्या होत्या. गिलने बाबर आझमच्या 2016 मध्ये तीन सामन्यांत 360 धावांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू 
360 धावा, बाबर आझम विरुद्ध वेस्ट इंडिज (2016)
360 धावा, शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड (2023)
349 धावा, इमरुल कायस वि झिम्बाब्वे (2018)
342 धावा, क्विंटन डी कॉक विरुद्ध भारत (2013)
330 धावा, मार्टिन गुप्टिल विरुद्ध इंग्लंड (2013 धावा)

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा