”मी मोदींचा माणूस आहे”;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन होताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावरील मंचावरून पंतप्रधानांचे कौतुक केले. दावोसमध्ये महाराष्ट्राला जी गुंतवणूक मिळाली ती मोदींमुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘दावोसमध्ये लक्झेंबर्ग, जर्मनी आणि सौदी अरेबियाच्या नेत्यांनी मला विचारले की तुम्ही मोदींसोबत आहात का, तेव्हा मी त्यांना सांगितले की मी मोदींचा माणूस आहे.’ मोदींसारखा नेता आपल्याकडे आहे ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला दोन इंजिनांच्या सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र काही लोकांच्या विश्वासघातामुळे जवळपास अडीच वर्षे राज्यात जनविरोधी सरकार होते. बाळासाहेबांच्या सच्च्या अनुयायांमुळेच आपले सरकार पुन्हा स्थापन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करून बीएमसी निवडणुकीचा सूर लावला. ते म्हणाले, ‘बीएमसीकडे खूप पैसा आहे, पण तो योग्य मार्गाने खर्च झाला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीचे सरकार तुमची सर्व स्वप्ने साकार करेल. पंतप्रधान म्हणाले, ‘राज्यात दुहेरी इंजिन सरकार नसल्यामुळे प्रत्येक कामात अडथळे येत होते. याचा फटका सर्वांनाच सहन करावा लागला. मुंबईचे भविष्य तयार करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत उत्तम समन्वय असलेले सरकार असणे आवश्यक आहे.
पंतप्रधान माननीय @narendramodi जी यांच्या शुभ हस्ते आज मुंबई मेट्रो च्या मेट्रो लाईन २अ आणि मेट्रो लाईन ७ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी हेदेखील उपस्थित होते.#MumbaiOnFastTrack#MumbaiMetro @PMOIndia pic.twitter.com/XzLls4e4J2
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 19, 2023
हेही वाचा – Narendra Modi: पीएम मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे, वाचा
मोदींनी मेट्रो-2 ए आणि मेट्रो 7 मार्गांचे उद्घाटन केले. इतर अनेक प्रकल्पांसह, त्यांनी एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांची मंजूर कर्जे पीएम स्वनिधी योजनेत हस्तांतरित केली. सीएसएमटी पुनर्विकासाची पायाभरणीही केली.
देशाचे पंतप्रधान माननीय @narendramodi जी यांनी #मुंबई तील ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केले. यानिमित्ताने बीकेसी मैदानावर झालेल्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले. pic.twitter.com/fQADWFzqaZ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 19, 2023
मोडींकडून मुंबईला भेट
- मेट्रो-2 ए आणि मेट्रो 7 चे उद्घाटन
- सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन
- 20 नवीन बाळासाहेब ठाकरे आपला दावाखान्याचे उद्घाटन
- भांडुप मल्टी स्पेशालिटी, सिद्धार्थ नगर हॉस्पिटल आणि गोरेगावमधील ओशिवरा प्रसूतिगृहाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी
- मुंबईतील 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरण योजनेचे उद्घाटन.
- सीएसएमटी पुनर्विकासाची पायाभरणी
- नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड लाँच
- पीएम स्वानिधी योजनेंतर्गत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या मंजूर कर्जाचे हस्तांतरण