Video: ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ गाण्याचं भोजपुरी Version ऐकलं का?


लता मंगेशकर यांनी गायलेले ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणे आजकाल सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आलं आहे. आता या गाण्याचे भोजपुरी रॅप व्हर्जन आले आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लता मंगेशकर यांच्या या गाण्यावर पाकिस्तानी मुलगी आयशाने डान्स केला होता, त्यानंतर हे गाणे पुन्हा ट्रेंडमध्ये आले. हे गाणे सोशल मीडियावर सुपरहिट झाले आहे. इंटरनेटवर या गाण्याचे अनेक व्हर्जन उपलब्ध आहेत. आता, गाण्याचं एक भोजपुरी रॅप व्हर्जन इंटरनेटवर तुफान गाजत आहे. सोशल मीडिया यूजर्सनी याला जबरदस्त म्हटले आहे.

बिहार जिप्सी सोल नावाच्या यूट्यूब चॅनलवर केले शेअर

हा व्हायरल व्हिडिओ बिहारी जिप्सी सोल नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. क्लिपमध्ये, मेरा दिल ये पुकारे आजा हे ऋषी राज यांनी भोजपुरीमध्ये गायले आहे. या गाण्याला UPSC वाला लव्ह देण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आयशाच्या काही स्टेप्स दिसत आहेत, त्यानंतर ऋषीराजचा रॅप सुरू होतो.

13 जानेवारी रोजी ऑनलाइन शेअर केल्यापासून हा व्हिडिओ 25,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक युजर्सनी कमेंटमध्ये गायक-रॅपर ऋषी राजचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “मजा आली भाऊ.”

उर्फी जावेद आहे करोडोंची मालकीण! संपत्ती जाणून तुम्हाला धक्का बसेल

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा