१३व्या रोझ फेस्टिवलचं रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
डोंबिवली येथील रोझ फेस्टिवल २०२३चं रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. इंडियन रोझ फेडरेशन ह्या संस्थेच्या सहकार्यातून महाराष्ट्रामधील गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थानी या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं. यंदा डॉ. विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे या मान्यवरांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. यावेळी वांगणीच्या आशिष मोरे यांच्या मोरे नर्सरीच्या गुलाबांना ‘गुलाबांचा राजा’ व ‘गुलाबांची राणी’ हे दोन पुरस्कार प्रदान केले. तर पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना ‘राजकुमार’ आणि वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला ‘राजकुमारी’ हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
सर्व विजयी स्पर्धकांचं आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. शिवाय पहिल्या वर्षांपासून या फेस्टिवलशी निगडीत असलेल्या विकास म्हसकर व मेघना म्हसकर या डॉक्टर दांपत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आज १३व्या रोझ फेस्टिवलचं उद्घाटन झालं. स्वतः फेरफटका मारत वेगवेगळ्या जातीचे गुलाब पाहण्याचा आस्वाद घेतला. या निमित्ताने झालेल्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पुरस्कार देऊन त्यांचं अभिनंदन केलं. पहिल्या दिवशी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे आभार!#Dombivli pic.twitter.com/j8ZHkDErpV
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) January 13, 2023
पुढील तीन दिवस हा फेस्टिवल सुरु राहणार आहे. शेकडो प्रकारचे गुलाब पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत या फेस्टिवलला नक्की भेट द्या. रोझ फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी फेस्टिवलबद्दलची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर टाकून जवळच्या आप्तेष्टांनाही या फेस्टिव्हलमध्ये सामील होण्यास सांगा. असं रवींद्र चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.