टीम इंडियाच्या नावावर २०२२ साली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विशेष विक्रम


२०२२ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी निराशाजनक होते. या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली, तर आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकातही संघाची निराशा झाली. मात्र, यंदा भारतीय संघाने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय संघाने यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम केला. भारतीय संघाने यावर्षी ४६ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आणि 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 38 सामने जिंकण्याचा विक्रम मागे टाकला. यापूर्वी भारतीय संघाने २०१७ मध्ये ३७, २०१८ मध्ये ३५ आणि २०१९ मध्ये ३५ सामने जिंकले होते.

भारतीय संघाने 2022 मध्ये ७२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये संघाने ४६ सामने जिंकले, तर २२ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना बरोबरीत संपला, तर तीन सामने अनिर्णित राहिले. भारतीय संघाने २०२२ वर्षाचा शेवट विजयाने केला आणि बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली.

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावावर आहेत अनेक खास रेकॉर्ड 

  • इशान किशनच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण द्विशतक (२१० धावा) करण्याचा विश्वविक्रम आहे. बांगलादेशविरुद्ध १२६ चेंडूत सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम इशानच्या नावावर आहे.
  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
  • विराट कोहलीने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक १,१४१ धावांचा विक्रम केला आहे. त्याने महेला जयवर्धनेला मागे सोडले.
  • विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७२ शतकांचा विक्रम केला आहे. त्याने रिकी पाँटिंगचा ७१ शतकांचा विक्रम मोडला.