रवींद्र चव्हाण यांच्याकडून राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शेकडो वर्ष मुघलांची गुलामी सहन करणाऱ्या आपल्या हिंदुस्थानाला स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती आहे. रयतेचं राज्य यावं ही त्यांची मनोधारणा होती. त्यांनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी पूर्ण केलं. त्यांच्या जयंतीदिनी इंदिरा चौक येथे मराठवाडा विदर्भ रहिवासी सेवा संस्था आयोजित जन्मोत्सव सोहळ्यास रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. छत्रपती शिवराय व जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केला.
शेकडो वर्ष मुघलांची गुलामी सहन करणाऱ्या आपल्या हिंदुस्थानाला स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती आहे. रयतेचं राज्य यावं ही त्यांची मनोधारणा होती. त्यांनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी पूर्ण केलं.#राजमाता_जिजाऊ #Dombivli pic.twitter.com/E8ejvewfNZ
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) January 12, 2023
युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवलीच्या इंदिरा चौकात स्वामी विवेकानंदांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रवींद्र चव्हाण यांनी अभिवादन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवलीच्या इंदिरा चौकात स्वामी विवेकानंदांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी दिलेले विचार आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी राहतील. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.#स्वामी_विवेकानंद #Dombivli pic.twitter.com/hLpWTcYyct
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) January 12, 2023